घरमहाराष्ट्रभाजपकडून एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी?

भाजपकडून एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी?

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष उमेदवारांची दुसरी यादी आज संध्याकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे. या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जागी त्यांच्या मुलगी अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. दरम्यान, पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे एकनाथ खडसे यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. खडसे यांचे नाव उमेदवारीच्या यादीत न आल्यामुळे खडसे समर्थक नाराज झाले आहेत. समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेऊन ते रस्त्यावर उतरले आहेत. एकनाथ खडसे यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास समर्थकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव नाही, तरी भरला अर्ज

- Advertisement -

गेल्या तीस वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे निवडून येत आहेत. मुक्ताईनगर मतदरासंघातील जनतेशी खडसे यांचे भावनिक संबंध आहेत. त्यांनी मतदारसंघात विकास कामे केल्यामुळे त्यांना लोकांनी सहा वेळा निवडून दिले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर खडसे यांना पक्षाकडून महसूलमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. मात्र, खडसे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून खडसे उपेक्षित आहेत. आता देखील खडसे यांना पहिल्या उमेदवारांच्या यादीत स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत आपले नाव येईल, अशी आशा खडसेंना आहे. एकनाथ खडसे एकेकाळी पक्षाचे तिकीट वाटप करायचे. मात्र, आज त्यांनाच आपल्या तिकीटाबाबत माहित नाही. यासंदर्भात खडसे देखील नाराज आहेत. ‘पक्षाशी प्रामाणिक राहाणे, हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे’, अशी निराश प्रतिक्रिया खडसे यांनी माध्यमांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -