घरमुंबईवरळीतून ४ उमेदवार बाद

वरळीतून ४ उमेदवार बाद

Subscribe

एकच बॅलेट युनिट लागणार

युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे विधानसभेचे वरळीतील उमेदवार आदित्य ठाकरे यांची बिनविरोध होणारी निवडणुकीत आता आणखी आव्हानाची ठरणार आहे. पण अर्ज छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता स्पर्धेतील चुरस थोडीशी कमी झाली आहे. चार अर्ज बाद झाल्याने आता एकाच बॅलेट युनिटवर ही निवडणुक सर्व मतदान केंद्रावर होणार आहे.एका बॅलेट युनिटवर कमाल १६ उमेदवार आणि एक शेवटचा पर्याय हा नोटाचा असतो. याआधी २० जणांनी उमेदवारी अर्ज भरल्याने दोन बॅलेट युनिट लागणार होते. पण आता ४ अर्ज बाद झाल्याने एकच बॅलेट युनिट लागणार आहे.

वरळीतून एकुण १० उमेदवारांनी वरळीतून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार दिलेला नाही. तर राष्ट्रवादीकडून सुरेश माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिग बॉस सेलिब्रिटी असलेला अभिजित बिचकुले यानेही वरळीतूनच आपला अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीकडून प्रताप हवालदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बसपाकडून विश्राम कदम, गौतम गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडी, किसन बनसोडे यांना भारतीय मायनॉरिटी सुरक्षा संघाने उमेदवारी दिली आहे.हे आहेत अपक्ष उमेदवारअभिजित बिचकुले, महेश खांडेकर, मिलिंद कांबळे अंकुश कुर्हाडे, विनायक सिकतोडे, अमोल निकाळजे, रूपेश तुर्भेकर, नितीन गायकवाड, मंगल राजगौर, संध्या माने, विजय सिकतोडे, सचिन खरात यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

- Advertisement -

वरळीतले बिचकुलेंचे आव्हान
वरळीतून अपक्ष म्हणून उभे राहणारे बिग बॉस फेस अभिजित बिचकुले हे अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत. पण अभिजित बिचकुले यांनी आपली कौटुंबिक संपत्ती अवघी ४ लाख ४५ हजार रूपये इतकी आहे. स्वतः अभिजित बिचकुले यांच्याकडे काहीच सोने नाही, तर त्यांच्या पत्नीकडे एक टु व्हिलर आहे. अभिजित बिचकुले यांनी सातार्‍यातूनही निवडणुक लढवण्याचे ठरविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -