घरमहाराष्ट्रमंदा म्हात्रेंचा पत्ता कट; बेलापूर मतदारसंघात गणेश नाईकांना भाजपचा हिरवा कंदील

मंदा म्हात्रेंचा पत्ता कट; बेलापूर मतदारसंघात गणेश नाईकांना भाजपचा हिरवा कंदील

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच भाजपवासी झालेल्या गणेश नाईक यांना नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे. गणेश नाईक यांनी बेलापूर मतदारसंघात विभागनिहाय कार्यकर्त्यांसोबत बैठका घ्यायला सुरुवात केल्याचीही माहिती मिळत आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत नाईक यांचा अवघ्या दीड हजार मतांनी मंदा म्हात्रे यांचा निसटता पराभव झाला होता. पुढच्या दोन दिवसांत युतीची घोषणा झाल्यानंतर गणेश नाईक यांच्या नाव जाहीर करण्यात येईल.

- Advertisement -

गणेश नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ नये, यासाठी मंदा म्हात्रे या सुरुवातीपासूनच विरोध करत होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचा विरोध डावलून लावत नाईक पिता-पुत्रांंना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. नाईक यांचे पुत्र संदिप नाईक हे ऐरोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तर गणेश नाईक हे गेली अनेक वर्ष बेलापूर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र २०१४ ला मोदी लाटेत त्यांचा निसटता पराभव झाला. मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांच्याविरोधात भाजपमधून निवडणूक लढवली होती.

युतीचं अखेर ठरलं

युतीचे काय होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात सर्वात जास्त चर्चेला येत असताना आता युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेला ११७ जागा देण्यासाठी भाजप तयार झाला आहे. शिवसेनेनेही ११७ जागांची ऑफर स्वीकारली आहे. मात्र सत्ता स्थापनेत मागच्यावेळेपेक्षा जास्त मंत्रिपदे मिळावीत, यासाठी शिवसेना अडून बसली असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. यावर लवकरच तोडगा काढून शनिवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -