घरमुंबईमोदींचं भाषण ऐकण्यासाठी मुंबईकर थांबलेही नाहीत!

मोदींचं भाषण ऐकण्यासाठी मुंबईकर थांबलेही नाहीत!

Subscribe

बीकेसीमध्ये महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणासाठी न थांबता अनेक मुंबईकरांनी घरचा रस्ता धरल्याचं पाहायला मिळालं.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये युतीची आज मोठी सभा झाली. या सभेमध्ये अपेक्षेप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकच उरले नसल्याच्या टीकेचा पुनरुच्चार केला. त्यासोबतच त्यांनी ईडीचा वापर, सुशीलकुमार शिंदेंचं काँग्रेस-राष्ट्रवादी थकल्याचं वक्तव्य अशा मुद्द्यांवर देखील टीका केली. मात्र, एकीकडे स्टेजवर हे सगळं घडत असताना दुसरीकडे समोर बसलेल्या कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मात्र वेगळंच काहीतरी घडत होतं. भाषणांमध्ये सर्वात आधी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि सर्वात शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालं. कधीकाळी मोदींच्या भाषणासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत होतं. आज मात्र, उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर लगेचच अनेकांनी घरचा रस्ता पकडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेना कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता!

शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये महायुतीची जाहीर सभा झाली. यावेळी सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. या भाषणात त्यांनी विरोधकांच्या सरकार ईडीचा वापर करत असल्याच्या आरोपाचा समाचार घेतला. ‘आम्हाला ईडीची गरज नाही, राज्यात विरोधकच उरलेले नाहीत’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. ‘स्वातंत्र्यलढ्याच्या काळात काँग्रेसमध्ये मोठे नेते होते. तेव्हा आदराने मान खाली जायची. आता शरमेने मान काली जाते. काँग्रेसचा विचार गेला आणि विकार आला. गेल्या ५०-६० वर्षांत आपण काँग्रेसचे चाळे पाहिले आहेत’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

बीकेसीमधल्या सभेमध्ये मोदींच्या भाषणाआधीच उद्धव ठाकरेंचं भाषण संपल्यावर मुंबईकरांनी धरला घरचा रस्ता! #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 18, 2019

दरम्यान, उद्धव ठाकरेंचं भाषण होताच समोर बसलेल्या अनेक मुंबईकरांनी सभेमधून काढता पाय घेतला. सभास्थानावरून बाहेर पडलेल्या मुंबईकरांची गेटवर गर्दी दिसत होती आणि आत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते असं चित्र दिसत होतं. लोकसभा निवडणुकांवेळी देखील नरेंद्र मोदींचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मोदी भाषण करत असताना मैदानाच्या मागच्या बाजूने लोकं निघून जात होते. आता पुन्हा एकदा मुंबईच्या बीकेसीमध्ये तसा प्रकार दिसून आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -