घरमुंबईयंदाही चुरस वाढणार

यंदाही चुरस वाढणार

Subscribe

यंदा आघाडी आणि युती झाल्याने मतांचे विभाजन न झाल्यानेच अणुशक्ती नगरची निवडणुक यंदा चुरशीची ठरणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार तुकाराम काते विरूद्ध मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक असा थेट सामना यंदा पहायला मिळणार आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत अवघ्या हजार मतांनी निसटता विजय नवाब मलिक यांनी अनुभवला होता. त्यामुळेच यंदा पक्षातल वाढलेली ताकद नवाब मलिक आपल्याही मतदारसंघात लावणार यात शंका नाही.

तुकाराम काते यांनीही आपली जागा शाबुत ठेवत यंदाही पक्ष श्रेष्ठींचा विश्वास मिळवत तिकिट मिळवले आहे. महत्वाचे म्हणजे यंदा आघाडी आणि युती झाल्याने अणुशक्तीनगर मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.2014 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. यावेळी शिवसेनेच्या तुकाराम कातेंना 39966 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना 38959, भाजपच्या विठ्ठल खरटमोल यांना 23767 आणि काँग्रेसच्या राजेंद्र माहुलकर यांना 17615 इतकी मतं मिळाली होती. मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वंचित बहुजनची आघाडीला होणारे मतदानही महत्वाचे ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीने यासिन इस्माईल सय्यद यांना उमेदवारी मिळाली आहे.

- Advertisement -

अणुशक्तीनगरमधून मुंबई शहरातील सर्वाधिक असे २७ उमेदवार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक असे अपक्ष उमेदवार आहेत. त्यापैकी १५ उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत. तर एमआयएमनेही शहानवाझ शेख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा एमआयएम किती मते खाणार यावरही ही लढत आणखी चुरशीची ठरणार आहे.नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयासाठी पुन्हा एकदा पक्ष संघटनेच्या जोरावर तयारी करत आहेत. गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात जात आहे. तर तुकाराम कातेही आपली संपुर्ण ताकद आणि केलेल्या कामांच्या जोरावर यंदाच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यंदा भाजप आणि काँग्रेस असे दोघेही उमेदवार नसल्याने या मतदानाचा नेमका कोण किती फायदा करून घेणार यावरच विजय निश्चित होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीलाही किती मतदान होणार याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.

नवाब मलिक आणि प्रकाश आंबेडकर यांची चांगली मैत्री पाहता याठिकाणी वंचितकडून शिवसेनेलाच जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या मतदारांना आपल्याकडे वळवताना भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून किती मदत मिळते यावर तुकाराम काते यांचे मताधिक्य असणार आहे. यंदा युती झाल्याने शिवसेना आणि भाजप एकत्रपणे लढत आहेत. त्यामुळेच जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार दोन्ही पक्षातील उमेदवारांसाठी कार्यकर्त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. म्हणूनच तुकाराम काते यांच्या पाठीशी दोन्ही पक्षातील किती कार्यकर्ते उभे राहतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.त्यामुळे यंदा अणुशक्ती नगरची लढत दोन्ही उमेदवारांना तितकीशी सोपी नसेल हे नक्की.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -