घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिवसेनेचाच; स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शरद पवार-सोनिया गांधी भेट ठरली

मुख्यमंत्री शिवसेनेचाच; स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शरद पवार-सोनिया गांधी भेट ठरली

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी राज्याला नवे सरकार मिळू शकले नाही. आता मात्र शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार आकार घेऊ लागले आहे. मागच्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहेत. त्यानंतर विदर्भ दौऱ्यावर असलेले शरद पवार दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीशी चर्चा करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या दिवशीच म्हणजे १७ नोव्हेंबरला दोन्ही नेत्यांची भेट होणार असून त्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच सुटेल. यामुळे शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. अखेर शिवसेनेला पाच वर्षांपासून मुख्यमंत्री पद आणि सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा होताना सध्यातरी दिसत आहे.

९ नोव्हेंबर रोजी तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर राज्यपालांनी एक एक करुन तीनही पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला निहित वेळेत सत्ता स्थापन करणे जमले नाही. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. दिल्लीतून काँग्रेसचे चाणक्य खासदार अहमद पटेल, के.सी. वेणूगोपाल आणि काँग्रेसचे संसदेचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी पाच-पाच सदस्यांची समिती गठित केली.

- Advertisement -
shiv sena congress ncp meeting
किमान समान कार्यक्रमासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक

५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री

मुख्यमंत्री पदावरुन भाजपशी कोडीमोड घेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. मात्र इथेही त्यांना अडीच – अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळणार अशी सुरुवातील चर्चा होती. मात्र आता यावर खुद्द राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पडदा टाकला आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखला पाहीजे, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, अशी ठाम भूमिका मलिक यांनी मांडली आहे. तसेच उपमुख्यमंत्री, कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदांबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -