घरमहाराष्ट्रएमआयएमची दुसरी यादी जाहीर

एमआयएमची दुसरी यादी जाहीर

Subscribe

चार मतदारसंघांचा समावेश

एमआयएमने चार मतदारसंघांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोलापूरच्या दोन मतदार संघांमध्ये उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. पहिल्या यादीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांचा समावेश होता. तर दुसर्‍या यादीमध्ये सांगोला, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार मतदारसंघांचा समावेश आहे. सांगोल्यातून शंकर सरगर, सोलापूर मध्यमध्ये फारूक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफिया शेख आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जागावाटपावरून फिस्कटल्यानंतर एमआयएम आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे, इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. परंतु,ओवेसी यांच्या निर्णयाची प्रकाश आंबेडकर यांना प्रतिक्षा होती. परंतु,त्यावेळी ओवेसी यांनी जलील यांची पाठराखण करत आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे संकेत दिले होते.तसा खुलासा देखील ओवेसी यांनी केला होता. जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, तोच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आता आंबेडकर यांनी देखील ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे लोकसभेला एकत्र लढलेले आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकले तर ,दोन्ही पक्ष आपले किती उमेदवार निवडून आणू शकतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -