घरमुंबईउद्या सेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद; महायुतीची अधिकृत घोषणा होणार

उद्या सेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद; महायुतीची अधिकृत घोषणा होणार

Subscribe

शुक्रवारी शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेना आणि भाजप पक्षाची पहिली संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत संपन्न होणार आहे. याअगोदर तीन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रक जारी करुन शिवसेना आणि भाजपची युती जाहीर केली होती. त्यानंतर पहिल्यांदा दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न होणार असून त्यात अधिकृतपणे युतीची घोषणा होणार आहे. या पत्रकार परिषदेत अनेक जागा वाटप आणि निवडणुकीशी संबंधित अनेक बाबींविषयी माहिती दोन्ही पक्षांकडून देण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्या संदर्भातही या परिषदेत माहिती दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – यादी जाहीर; शिवसेना या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढणार!

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अर्ज दाखल करणार

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज, गुरुवारी वरळी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहा वाजता नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत भाजपचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -