घरमहाराष्ट्रयुतीवर प्रश्नचिन्ह? शिवसेनेच्या कोट्यातील उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु

युतीवर प्रश्नचिन्ह? शिवसेनेच्या कोट्यातील उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या संभाव्य युतीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तसेच दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी देखील जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधीच शिवसेनेने काही आमदारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप सुरु केले आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी २८८ जागांवरील इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेऊन युती होणारच असे सांगितले होते. मात्र त्याआधीच तब्बल ९ आमदारांना मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप केल्यामुळे पुन्हा एकदा युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर जिथे युतीमध्ये वाद नाहीत. ज्या जागा शिवसेनेच्याच आहेत, फक्त त्याच जागावरील उमेदवारांना एबी फॉर्म दिले असल्याची माहिती शिवसेनेकडून मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी संजय शिरसाट, सावंतवाडी मतदारसंघासाठी दीपक केसरकर तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहाही आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच दापोली, खेड, मंडणगड मतदार संघाचे अधिकृत उमेदवार योगेश कदम यांना देखील एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. नाशिकमधून सिन्नरचे आमदार पराग वाजे, देवळालीचे योगेश घोलप आणि निफाडचे अनिल कदम देखील मातोश्रीकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

आज घटस्थापनेचा मुहूर्त आहे. २०१४ रोजी घटस्थापनेच्याच दिवशी शिवसेना-भाजप युती तुटल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच आघाडीनेही आपली आघाडी तोडली होती. सध्या युती-आघाडीमध्ये चर्चांचे सत्र सुरु आहे. मात्र त्याआधीच शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. तर काँग्रेसने आपल्या ५१ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

लढाई कोल्हापूर उत्तरची…?पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी मा.शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेतला.

Rajesh Kshirsagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 29, 2019

- Advertisement -

 

आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने व प्रेरणा घेऊन चालणारे, "शिवसेना" पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पुन्हा संभाजीनगर…

Sanjay Shirsat – संजय शिरसाट ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 29, 2019

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -