घरमहाराष्ट्र'सेना-भाजपने एकत्र यावे आणि मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा लवकर करावी'

‘सेना-भाजपने एकत्र यावे आणि मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा लवकर करावी’

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येवून निवडणूक लढवावी, त्यांनी आपसातील जागा वाटप निश्चित करावे मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा अजिबात झालेली नाही. त्यामुळे मित्रपक्षांशी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर म्हणजेच येत्या दोन दिवसात करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

भाजप – १४४, शिवसेनेत – १२६ आणि मित्रपक्ष १८ असा जागा वाटपाचा फार्म्युला पुढे आला असून या फार्म्युल्याचे रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही स्वागत करत आहोत. मित्र पक्षांना मिळणार्‍या १८ जागांपैकी रिपाईला १० किंवा ९ जागा सोडण्यात याव्यात. तसेच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली असून शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रीपदाला रिपाईचा पाठिंबा राहिल असेना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाईला किमान ९ जागा सोडण्यात याव्यात तसेच निवडून येणार्‍या नव्या सरकारमध्ये म्हणजे महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये रिपाईला १ कॅबिनेट मंत्रीपद आणि १ राज्यमंत्रीपद तसेच तीन महामंडळाची अध्यक्षपदे व उर्वरीत महामंडळांची सदस्यपदे आणि १ विधान परिषद सदस्यत्व (एमएलसी) देण्यात यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा कधी होणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पितृपक्ष संपल्यानंतर २९ सप्टेंबरला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना आता १ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर ‘युती झाली हो…’, असे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी मुंबईत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करतील, असेही सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -