घरमुंबईमालाड खुणावतोय भाजपाला!

मालाड खुणावतोय भाजपाला!

Subscribe

शिवसेना-भाजपाची युती झाल्यास अस्लम शेख यांचा गेम होणार असून मालाडवर कमळ उगवण्याची रणनिती भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.

उत्तर मुंबईतील एकमेव मालाड पश्चिम हा मतदार संघ काँग्रेसकडे असून कोणत्याही परिस्थितीत हा गड ताब्यात घेण्याची स्वप्ने भाजपकडून पाहिली जात आहेत. त्यामुळे विद्यमान काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यासाठी ही निवडणूक जड जाणार आहे. सध्या शिवसेना आणि भाजपाची हवा पाहून अस्लम शेख यांनीही त्या दिशेने वळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शिवसेना-भाजपाची युती झाल्यास अस्लम शेख यांचा गेम होणार असून मालाडवर कमळ उगवण्याची रणनिती भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.

tough fight between bjp, congress over malad west assembly constitution

- Advertisement -

अस्लम शेख यांना निवडणूकीत मोठे आव्हान

मागील २००९ आणि त्यानंतर २०१४ अशाप्रकारे सलग दोन वेळा आमदार बनलेल्या काँग्रेसचे अस्लम शेख यांच्यासाठी ही निवडणूक मोठे आव्हान ठरणारी आहे. मागील निवडणुकीत भाजपाचे डॉ.राम बारोट यांच्याकडून सव्वा दोन हजार मतांनी निसटता विजय मिळवला होता. परंतु यावेळी युती झाली किंवा नाही झाली. तरी हाताच्या पंजावर मिळणारी मते विजय मिळवून देणारी नसल्याने शेख यांनी शिवसेना-भाजपाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यापैकी भाजपाने आपले दरवाजे बंद केल्यामुळे शेख यांना शिवसेनेची प्रवेशाची प्रतीक्षा आहे. परंतु युतीमुळे शेख यांचा प्रस्ताव तुर्तास शिवसेनेने ऑप्शनला ठेवला आहे. त्यामुळे युती झाल्यास शेख यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. परंतु युती न झाल्यास शिवसेनेची दरवाजे खुली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन २००९च्या निवडणुकीत अस्लम शेख यांना ५१, ६३५ मतदान झाले होते. तर २०१४मध्ये त्यांच्या पारड्यात ५६ हजार ५७४ एवढी मते पडली होती. त्या तुलनेत २००९मध्ये भाजपाचे उमेदवार आर.यु.सिंग, यांना २३ हजार ९४० मते मिळाली होती. तर २०१४च्या निवडणुकीत भाजपाचे बारोट यांना तब्ब्ल ५४ हजार २७१ मते मिळाली. त्यामुळे भाजपाच्या मतांची आकडेवारी दुपटीपेक्षा अधिकने वाढल्याचे दिसून आले. म्हणजे शेख यांचे मतदान ६ टक्क्यांनी कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा – मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६२

भाजपा, काँग्रेसमध्येच मुख्य लढत

परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना ८८ हजार ८६५ एवढे मतदान झाले. जर २०१४मधील शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता ती संख्या ७२ हजार एवढी होती. त्यातुलनेत शेट्टी यांना ८८ हजार मतदान झाल्याने युतीच्या मतदानात १६ हजारने वाढ झाल्याचे दिसून येते. तर आघाडीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना या निवडणुकीत ६८ हजार ८३८ मतदान झाले. त्यामुळे मागील विधानसभेच्या निवडणुकीतील आघाडीची मते पाहता त्यांच्या मतदानात १२ हजारने वाढ झाली आहे. त्यामुळे शेख यांच्यासाठी ही बाब समाधानकारक असली तरी खुद्द शेख यांना आता हा मतदार संघ सुरक्षित वाटत नाही. त्यामुळेच त्यांची नजर आता भिरभिरु लागली आहे. या मतदार संघातून भाजपाचे उमेदवार डॉ. राम बारोट यांच्यासह विनोद शेलार हे इच्छुकांच्या रांगेत आहेत. परंतु अ‍ॅड. आशिष शेलार हे आमदार असल्याने एकाच घरात दोन जागा देणे शक्य नसल्याने विनोद शेलार यांचा पत्ता कापला जावू शकतो. परंतु या मतदार संघातील लढत ही काँग्रेस आणि भाजपामध्ये असल्याने बाकीच्या पक्षाकडून कोण निवडणूक रिंगणात उतरते याला फारसे महत्व राहत नाही.

- Advertisement -

मालाड विधानसभा मतदारसंघ

अस्लम शेख (काँग्रेस) – ५६,५७४
राम बारोट (भाजप) – ५४,२७१
डॉ. विनय जैन (शिवसेना) – १७,८८८
दिपक पवार (मनसे) – १४, ४२५
सिरील डिसोझा (अपक्ष) – २८३९

मतदार संघाची एकूण स्थिती

एकूण मतदार – सुमारे सव्वातीन लाख
मुस्लिम मतदार – सुमारे १ लाख
गुजराती मतदार – १५ ते १६ हजार
मराठी भाषिक मतदार – ७० हजार
उत्तर भारतीय मतदार – २० ते २५ हजार
दक्षिण भारतीय मतदार – ३० ते ३५ हजार
ख्रिश्चन व कोळी मतदार – २० ते२५ हजार
इतर मतदार – २० ते २५ हजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -