Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE जागतिक कोरोना अपडेट कोरोना लसीबाबत ट्रम्प यांची घोषणा, 'ज्याचा कोणी विचार केला नव्हता ते आम्ही...

कोरोना लसीबाबत ट्रम्प यांची घोषणा, ‘ज्याचा कोणी विचार केला नव्हता ते आम्ही करून दाखवलं’!

Related Story

- Advertisement -

संपूर्ण जगाच लक्ष कोरोनावर लस कधी येणार याकडे लागलं आहे. अनेक देशात या लसीवर संशोधनही सुरू आहे. रशिया – चीन या देशांनी कोरोनावर लस तयार केल्याचा दावाही केला आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहचली असल्याचे सांगितले आहे. लवकरच तीची चाचणी पुर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

AstraZeneca ची लस कोरोनाविरोधात वापरण्यासाठी परवानगी मिळेल असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, मला तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, AstraZeneca ची लस तिसऱ्या वैद्यकीय चाचणीत पोहचली आहे. कोरोना लस तयार करणाऱ्यांमध्ये AstraZeneca आघाडीवर आहे. यासोबतच Moderna आणि Pfizer यांची लसही तिसऱ्या टप्प्यात आहे.

- Advertisement -

पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने काही महिन्.तच कोरोना लसीच्या बाबतीत प्रगती केली आहे. नाहीतर या सगळ्याला अनेक महिन्यांचा कालावधी लागला असता. पण आम्ही काही महिन्यातच करुन दाखवलं. अमेरिकेत आम्ही अशा गोष्टी करत आहोत ज्याचा इतर कोणी विचारही केला नव्हता.” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातील कोरोना रुग्णांचं प्रमाण ३८ टक्क्यांनी कमी झालं असल्याचंही ते म्हणाले आहेत.


हे ही वाचा – तुमचा पार्टनर पण इमोशनल चिटींग करतो का? कसे ओळखाल!


- Advertisement -