घरताज्या घडामोडीभाजपात बंडखोरीची लागण औरंगाबादेतून दोघांचे अर्ज

भाजपात बंडखोरीची लागण औरंगाबादेतून दोघांचे अर्ज

Subscribe

पदवीधर मतदारसंघ निवडणूक

राज्यात १ डिसेंबरला होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरीची चांगलीच लागण लागली आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठवाड्यातील दोन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसला आहे.

- Advertisement -

भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील चार उमेदवारांची घोषणा सोमवारी केली. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे.

पुण्यात संग्राम देशमुख (भाजप), जयंत आसगावकर (काँग्रेस), रुपाली पाटील ठोंबरे (मनसे), अभिजित बिचकुले आणि सोमनाथ साळुंखे (वंचित) यांच्यात लढत होईल. तर नागपूरमध्ये संदीप जोशी (भाजप), अभिजित वंजारी (काँग्रेस) आणि राहुल वानखेडे (वंचित) यांच्यात सामना होईल. औरंगाबादमध्ये शिरीष बोराळकर (भाजप), प्रवीण घुगे (भाजप बंडखोर), रमेश पोकळे (भाजप बंडखोर) आणि नागोराव पांचाळ (वंचित) असा सामना असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -