घरताज्या घडामोडीखळबळजनक... हाथरस प्रकरणात नक्षल कनेक्शन!

खळबळजनक… हाथरस प्रकरणात नक्षल कनेक्शन!

Subscribe

बनावट वहिनी बनून रचला जात होता कट, पोलिसांचा दावा

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सूर असताना शनिवारी या घटनेत नक्षल कनेक्शन समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एसआयटीची टीम मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील एका महिलेचा शोध घेत असून ही महिला संशयित नक्षलवादी असून पीडितेच्या घरात वहिनी म्हणून राहत होती. नक्षलवादी महिला पीडित मुलीच्या घरात १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या काळात कट रचत होती, एसआयटीच्या चौकशीत हा तपास समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे.

नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलीस आणि एसआयटीशी बोलत होती. त्याचवेळी घटनेच्या २ दिवसांनंतर संशयित महिला पीडित मुलीच्या गावी पोहोचली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती कुटुंबातील सदस्यांना भडकावत असल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेची वहिनी बनलेल्या नक्षलवादी कार्यकर्त्याच्या कॉल डिटेलमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सध्या उत्तर प्रदेश पोलीस आणि एसआयटीची टीम परकीय फंडिंगसंदर्भात नक्षलवादी कनेक्शनवर तपासकाम करत आहे.

- Advertisement -

एसआयटीच्या तपासणीत यापूर्वी जातीय दंगलीचे षड्यंत्र उघड झाले होते. आता पोलीस त्या महिलेचा आणि तिच्या जवळच्या मित्रांचा शोध घेत असून एसआयटी टीमने ४ डझन लोकांची चौकशी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून ते पीएफआयचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. नेपाळ सीमेवर पीएफआयच्या सदस्यांपैकी एक बहराइचमधील जरवलचा रहिवासी आहे. बहराइच पोलिसांचे म्हणणे आहे की, हा परिसर भारत-नेपाळ सीमेला लागूनच आहे आणि पीएफआयशी संबंधित इतर काही लोकांना अलिकडच्या काळात अटक करण्यात आली आहे, असे बहराइच पोलिसांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश व देशात जातीय दंगली पसरवण्यासाठी भारत-नेपाळ सीमेवर पीएफआयच्या कोणत्या हालचाली सुरू आहेत हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -