घरताज्या घडामोडीराज्यभरात शेकडो शिक्षक कोरोनाबाधित

राज्यभरात शेकडो शिक्षक कोरोनाबाधित

Subscribe

शाळा सुरू होण्याआधीच्या चाचणीत उघड

९वी ते १२ पर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयानंतर खबरदारी म्हणून या वर्गांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत शेकडो शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शिक्षण संस्थांची तारांबळ उडाली आहे. शाळा सुरू होण्याच्या ऐन दिवसात हे संकट आल्याने पालकांमध्ये यामुळे भीती निर्माण झाली असताना शिक्षण विभागापुढेही अडचण उभी राहिली आहे.

शाळा सुरू होणार म्हणून या शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात उस्मानाबादमधील ४८ तर नागपूरमधील ४१ शिक्षकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. बीडमध्ये २५ शिक्षक कोरोनाबाधित निघाले असल्याचे शिक्षण विभागातील संबंधितांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राज्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत शिकविणारे शिक्षक आणि संबंधित कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 48 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 9 वी ते 12 पर्यंतच्या 491 शाळा असून त्यात 4 हजार 593 शिक्षक आहेत. त्यापैकी 3 हजार 786 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

नागपूरमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीत ४१ शिक्षक पॉझिटिव्ह निघाले. यात ग्रामीण नागपूरमधील २५ जणांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये चाचणी घेण्यात आलेल्यांपैकी नऊ जणांना संसर्गाची लागण झाली आहे. यात एका शिक्षकेतर कर्मचार्‍याचाही समावेश आहे. कोल्हापुरात १७ शिक्षक बाधित असल्याचे उघड झाले. शहरातील 16 शिक्षकांचे अहवाल पॅाझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील 8 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. हे आठही शिक्षक माध्यमिक वर्गातून शिकवणारे शिक्षक आहेत. नांदेडमधील आठ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे नांदेडमधील कोरोनाबाधितांची संख्या ही 19 हजार 841 इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार कोल्हापुरातील 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधित शिक्षकांची संख्या
नाशिक – ३४
बीड – 25
उस्मानाबाद – 48
सिंधुदुर्ग – 8
नांदेड – 8
कोल्हापूर – 17
औरंगाबाद – 9
नागपूर – 25

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -