घरदेश-विदेशवडिलांनी फोन काढून घेतल्याने दहावीतील मुलीची आत्महत्या

वडिलांनी फोन काढून घेतल्याने दहावीतील मुलीची आत्महत्या

Subscribe

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वडिलांनी फोन काढून घेतल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना इंदूरच्या चंदन नगरमध्ये घडली आहे. खुशी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अशी घडली घटना

बुधवारी रात्री उशीरापर्यंत खुशी मोबाईलवर गेम खेळत होती. यावेळी तिच्या वडिलांनी खुशीच्या हातातील फोन काढून घेत तिला झोपण्यास सांगितले. त्यानंतर खुशीचे आई-वडील दोघेही त्यांच्या एका नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी गेले. त्यावेळी घरात असलेल्या खुशीने खोलीत फाशी घेत आत्महत्या केली. हेडफोन्स आणण्यासाठी वडिलांनी खुशीच्या भावाला घरी पाठवले. त्यावेळी खुशी तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर खुशीचे आई-वडील आणि नातेवाईक तातडीने घरी धाव घेतली. यावेळी त्यांना खुशी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. पालकांनी खुशीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टर्सने खुशीला मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -