Video – पिल्लू वाचवण्यासाठी गेलेल्या ११ हत्तींचा मृत्यू

३ वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या ११ हत्तींना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे.

Thailand
Thailand Elephants
११ हत्तींचा मृत्यू

थायलंडमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. दक्षिण थायलंडमधल्या खाओ याई राष्ट्रीय अभयारण्यात एका ३ वर्षांच्या हत्तीच्या पिल्लाचा पाय घसरला आणि ते पिल्लू धबधब्यात पडले. या पिल्लाला वाचवण्यासाठी इतर हत्तींने देखील त्या धबधब्यात उड्या घेतल्या. मात्र, त्यात ११ हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला मृत हत्तींचा आकडा ६ होता. मात्र, आता हा आकडा वाढला असल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण थायलंडमधल्या खाओ याई राष्ट्रीय अभयारण्याच्या दिशेने हत्तीचा कळप त्या मार्गाने जात होता. त्या दरम्यान, हत्तीच्या ३ वर्षाच्या पिल्लाचा पाय घसरुन ते पिल्लू हाईव नॅरॉक या धबधब्यात पडले. पिल्लू पडल्याचे इतर हत्तींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील त्या धबधब्यात उड्या घेतल्या आणि त्यात बाकी ११ हत्ती देखील बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती खाओ याई नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिली असून ड्रोनच्या माध्यमातून मृतदेहांचा शोध लागल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील १९९२ साली देखील अशीच घटना घडली होती. त्यावेळी देखील ८ हत्तींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.