घरदेश-विदेश२० मिनिटे स्टेशनवर अगोदर या नाहीतर गाडी सुटलीच

२० मिनिटे स्टेशनवर अगोदर या नाहीतर गाडी सुटलीच

Subscribe

विमान तळाप्रमाणे लांब पल्ल्याच्या रेल्वेची स्थानके सील करण्याचा विचार भारतीय रेल्वेकडून होत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याची रेल्वे पकडण्यासाठी आता प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या १५ ते २० मिनिटे अगोदर रेल्वे स्थानकात हजर राहून सुरक्षा तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेला ही सुरक्षा योजना अलाहाबाद रेल्वे स्थानकावर अगोदरच बसवण्यात आली आहे. या महिन्यात अलाहाबादेत कुंभमेळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील रेल्वे स्थानकावर ही व्यवस्था तयार करण्यात आली आहे. तसेच कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकासाठीही अशी सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली असून देशभरातील २०२ रेल्वे स्थानकांची ब्लू-प्रिंट तयार आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले.रेल्वे स्टेशन सील करण्याची योजना आहे. प्राथमिक अवस्थेत रेल्वे स्थानकात येण्याचे मार्ग हेरून त्यापैकी कुठले बंद करायचे याचा विचार सुरू आहे. काही मार्ग कायमस्वरुपी भिंतीने बंद करण्यात येतील तर काही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांमार्फत आणि हलवू शकणार्‍या गेटमार्फत बंद केले जातील, असे अरुण कुमार म्हणाले.

- Advertisement -

प्रत्येक गेटवर प्रवाशांची आणि त्यांच्या समानांची तपासणी केली जाईल. मात्र विमान तळाप्रमाणे प्रवाशांना गाडीच्या सुटण्याच्या वेळेपूर्वी एक-दीड तास नव्हेतर १५ ते २० मिनिटे अगोदर यावे लागेल. जेणे करून त्यांना सुरक्षेच्या कारणामुळे उशीर होणार नाही. सुरक्षा वाढेल, पण सुरक्षा दलाचे जवान नाहीत, असेही अरुण कुमार यांनी सांगितले. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्यामुळे मनुष्यबळ फारसे लागणार नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -