घरदेश-विदेशसहाव्या टप्प्यात ६३.३ टक्के मतदान

सहाव्या टप्प्यात ६३.३ टक्के मतदान

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये उमेदवाराला मारहाण, उत्तर प्रदेशात दोन गटात झटापट आणि ईव्हीएम मशिनमधील बिघाड या घटना सोडल्या तर लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांमध्ये मतदान शांततेत पार पडले. सात राज्यातील ५९ मतदार संघात संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ६१.१४ टक्के मतदान झाले. या टप्प्याबरोबरच आता लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि सातवा टप्पा शिल्लक असून त्यासाठी १९ मे रोजी मतदान होणार आहे.

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पश्चिम बंगलामध्ये भाजपचे उमेदवार भारती घोष यांच्या कारवर रविवारी सकाळी तृणमूलच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मात्र या हल्ल्यातून भारती घोष बचावल्या. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये दोन गटामध्ये झटापटी झाली. पण पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. या टप्प्यातही ईव्हीएम मशिन बिघाडाच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, पश्चिम बंगालमधील ८, बिहार ८, मध्य प्रदेश ८ दिल्ली ७ आणि झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान पार पडले. या टप्प्यात ९७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सहाव्या टप्प्यात सांयकाळी आठ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार, ६३.३ टक्के मतदान झाले आहे. त्यातही सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ८०.१६ टक्के इतके झाले.

- Advertisement -

सहाव्या टप्प्याच्या मतदाननंतर आता लोकसभा निवडणुकीचा एकच टप्पा शिल्लक आहे. या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी १९ तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर सुमारे दीड महिना सुरू असलेला हा लोकशाहीचा सोहळा संपुष्ठात येणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -