घरदेश-विदेश१५ किमीचा पाठलाग करून अपहरण झालेल्या महिलेचा पोलिसांनी केला बचाव

१५ किमीचा पाठलाग करून अपहरण झालेल्या महिलेचा पोलिसांनी केला बचाव

Subscribe

कोलकातामधील ट्रक ड्रायवरच्या केबिनमध्ये हात पाय बांधून ठेवलेल्या एका महिलेचा बचाव पोलिसांनी ट्रकचा १५ किमी पाठलाग करून केला.

महिलांसोबत घडणाऱ्या वाईट घटनांमध्ये सध्या फार वाढ होत आहे आणि कोलकातामध्ये देखील मध्यंतरी अशीच एक घटना घडलेली आहे. एका नागरी स्वयंसेवकाकडून टिप मिळाल्यानंतर पूर्व बर्दवान जिल्ह्यातील पोलिसांनी एका ट्रकचा पाठलाग करायला सुरूवात केली. तर या ट्रकचा १५ किमीपर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी ट्रकमध्ये बांधून ठेवलेल्या एका मूक बधिर महिलेचा बचाव केला. या महिलेला ट्रक चालकाच्या सिटमागे हात पाय बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या प्रथम कारवाईनंतर त्यांना कळण्यात आले की या ३० ते ३५ वर्षीय महिलेला ट्रक चालकानी बलात्कार करण्याच्या उद्देशाने अपहरण केलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पूर्व बर्दवान जिल्ह्यातील गुस्कर येथे मोटारसायकलवरून पेट्रोलिंग करत असताना, नागरी स्वयंसेवक बिकाश गोराईनं ट्रकच्या केबिनमधून या महिलेचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यानं ट्रक चालकाला बाहेर यायला सांगितलं, मात्र तो गाडीतून न उतरता गाडी पुढे चालवू लागला. गोराई ट्रकचा पाठलाग करू लागला मात्र त्याची मोटारसायकल ट्रकचा पाठलाग करू शकत नाही महणून तो थांबला. त्यानंतर त्यानी स्थानिक पोलिस स्टेशनाशी संपर्क साधला आणि त्यांना वाहनाचा नोंदणी क्रमांक दिला.पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना हा ट्रक दिसला आणि त्यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला.

‘ट्रक राज्य महामार्गावरुन चालत असताना वाहनचालकांच्या बेपर्वाईमुळे त्याच्या पुढे जाणं अवघड होते. जेव्हा आम्ही त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा तो आमच्या गाडी जवळ येऊन धडक देण्याचा प्रयत्न करायचा.’
– पोलीस अधिकारी

- Advertisement -

एका चौकात पोहोचल्यानंतर पोलिसांनी पटकन त्यांची गाडी ट्रक चालकाच्या पुढे घेतली आणि त्याला थांबावलं. ट्रकचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना ट्रक चालकाच्या सीट मागे हात पाय बांधून ठेवलेली ही महिला सापडली.

अपहरण आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ट्रक चालक अबुल शेखला अटक केली आणि त्याच्यावर सू मोटो गुन्हा दाखल केला. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी राज्य शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


हेही वाचाः हनीमूनसाठी पत्नीला दार्जिलिंगला नेलं; पत्नीनं मागितला घटस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -