घरदेश-विदेशअॅमेझॉन कंपनीत झालेल्या अपघातात २४ जण जखमी

अॅमेझॉन कंपनीत झालेल्या अपघातात २४ जण जखमी

Subscribe

अॅमेझॉनच्या न्यू जर्सी येथील कंपनीत झालेल्या अपघातात २४ कर्मचारी जखमी झाले आहेत. मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.

जगातील सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग सेवा पूरवणाऱ्या अॅमेझॉन कंपनीत दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत स२४ कर्मचारी जखमी झाले आहेत. यामधील एका कर्मचाऱ्याची परिस्थीती गंभीर असल्याचे ABC News या वृत्तवाहिनीने सांगितले आहे. अॅमेझॉन कंपनीच्या न्यू जर्सी येथील कंपनीत हा अपघात झाला आहे. अपघातानंतर येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कपंनीच्या बाहेर काढण्यात आले आहे. न्यू जर्सीतील रॉबिन्सविले या शहरात असलेल्या १.३ दशलक्ष स्केअर फुट कार्यालयात ३ हजार हून अधिक कर्मचारी काम करतात. दरम्यान मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. अॅमेझॉन ही आॅनलाईन शॉपिंग कंपनी असून जगभरात त्यांच्या शाखा आहेत.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती

अॅमेझॉन कंपनी ही मोठी असून येथे पॅकिंगचे काम केले जाते. या कंपनीत पॅकिंग करण्यासाठी अनेक मशिन्स आहेत. पॅकिंग करणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात झाला असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे आमचे पहिले प्राधान्य आहे. पुढील २४ तास या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. घटनेची चैकशी करुन त्याचा अहवाल प्रदर्शित केला जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -