अमित शहांना मुस्लिम मुक्त देश हवा – ओवेसी

भाजप तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत जिंकणार नाही, असा दावा ओवेसी यांना केला आहे.

Bahadurpura
Asaduddin owaisi
एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. येत्या ७ डिसेंबरला तेलंगणामध्ये मतदान होणार आहे. हे मतदान तेलंगणाच्या ११९ जागांसाठी होणार आहे. आंध्र प्रदेशमधून विभक्त झाल्यानंतर तेलंगणाची ही पहिली विधानसभा निवडणूक असणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसी तेलंगणामध्ये गेले आहेत. तेलंगणामध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओवेसी यांनी भाजपवर निशाना साधला आहे. त्यांनी एका भाषणात म्हटले की, ‘भाजप अध्यक्ष अमित शहा यांना एमआयएम मुक्त नाही तर मुस्लिम मुक्त देश हवा आहे’.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओपन चॅलेंज; ‘हिम्मत असेल तर हैद्राबादमधून लढा’!

नेमकं काय म्हणाले ओवेसी?

तेलंगणातील बहादुरपूर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. ओवेसी म्हणाले की, ‘अमित शहा म्हणतात मजलिस मुक्त देश करायचे आहे, पण अमित शाह मजलिस मक्त नव्हे तर मुसलमानांना पळवून लावू इच्छितात. परंतु, मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे’. त्याचबरोबर भाजपने कितीही प्रयत्न केला तरी तेलंगणात यश मिळणार नाही, असे ओवेसी म्हणाले.

हेही वाचा – शिवसेना मोदींना घाबरले, त्यांना फक्त आग्रलेख लिहिता येतात – ओवैसी

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’

ओवेसी यांनी भाजपसोबत कॉंग्रेस आणि तेलगू देसम यांच्यावरही टीका केल्या आहेत. त्याचबरोबर भाजप, कॉंग्रेस आणि तेलगू देसम यांच्यापैकी कुणाचीही सत्ता आली तर राज्याचे कामकाज दिल्ली, आंध्र प्रदेश किंवा नागपूर येथून चालेल, असेही ओवेसी म्हणाले. असं म्हणताना त्यांनी मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?, असा सवाल त्यांनी लगवला आहे.


हेही वाचा – आंबेडकर-ओवेसी युती भाजपच्या पथ्यावर – शिवसेनेचा हल्लाबोल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here