घरदेश-विदेशचौकीदार भडकले; उतरले निवडणुकीच्या रिंगणात

चौकीदार भडकले; उतरले निवडणुकीच्या रिंगणात

Subscribe

निवडणूक जवळ आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणून घेत इतर राजकीय पक्षाकडून चौकीदारांचा अपमान करण्यासाठी संधी देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मै भी चौकीदार या मोहिमेवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. चौकीदार यावरुन मोदींसह भाजपवर जोरदार टीका होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चौकीदार या शब्दाचा प्रचार होत आहे. ऐवढेच नाही तर भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द लावला. चौकीदार या शब्दावरुन राजकारण होऊ लागल्यामुळे तसंच चौकीदार शब्दावर होत असलेल्या टीकेविरोधात चौकीदार युनियनने आक्षेप घेतला. दरम्यान भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चौकीदारांनी केली आहे. दरम्यान, चौकीदारच आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. चौकीदार ६ जागांवर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पंजाबमधील आनंदपूर साहिब, फतेहगढ साहिब, पटियाला आणि ३ अन्य जागांवर निवडणूक लढवणार आहेत. हे सर्व चौकीदार लाल झंडा पेंडू चौकीदार यूनियन पंजाब (सीटू) या बॅनरखाली निवडणूक लढवणार आहेत.

चौकीदार शब्दावरुन राजकारण

चौकीदार युनियनने असे सांगितेल आहे की, गेल्या काही दिवसापासून चौकीदार नावावरुन राजाकरण होत आहे. काही राजकीय पक्षांनी ‘चौकीदार चौर है’ असे संबोधित केले. जे आम्हाला आपमानित करण्यासारखे आहे. हा अपमान त्यांना दररोज सहन करावा लागत आहे. दरम्यान, या संघटनेने असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार असे म्हणून घेण्याआधी त्यांनी हे देखील पाहिले नसेल की चौकीदारची काय परिस्थिती आहे, ते कसे जीव जगत आहेत? त्यांनी कधी चौकीदारांच्याबद्दल विचार केला नाही. मात्र, आता निवडणूक जवळ आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणून घेत इतर राजकीय पक्षाकडून चौकीदारांचा अपमान करण्यासाठी संधी देत आहेत.

- Advertisement -

चौकीदारांच्या मुलींना घराबाहेर पडणे कठिण झाले

लाल झंडा पेंडू चौकीदार यूनियनचे अध्यक्ष परमजीत सिंह नीलो, अमरजीत सिंह यांच्यासोबत अन्य चौकीदारांनी बुधवारी निवडणुक आयोग अधिकारी डॉ. एसके राजू यांच्याकडे तक्रार केली. राजकारणासाठी चौकीदारांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक काळात सर्वच जागी चौकीदारला चोर म्हणून अपमानित केले जात आहे. दरम्यान, चौकीदारांची सध्या परिस्थिती खूप कठिण आहे. त्यांचे घरातून बाहेर पडणे कठिण झआले आहे. त्यांच्या मुलींना पाहून लोकं म्हणतात ‘ती बघा चौकीदारची मुलगी’.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -