दिल्लीच्या विकासासाठी एकत्र काम करूया; केजरीवालांची पंतप्रधानांना विनंती

लोकसभेतील पराभवानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.

New Delhi
arvind-kejriwal-meets-pm-narendra-modi
अरविंद केजरीवालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

१७व्या लोकसभा निवडणूकीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. या भेटीत दिल्लीच्या विकासासाठी एकत्र काम करण्याविषयी चर्चा झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितले.

पंतप्रधानांचे अभिनंदन केले

आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान भेटीत झालेल्या महत्त्वाच्या चर्चांविषयी सांगितले आहे. या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्ली आणि केंद्र सरकारने एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. यावेळी १७व्या लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पंतप्रधान आणि त्यांच्या भेटीत झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अरविंद केजरीवाल यांनी उल्लेख केला आहे.

पाणी साठ्याविषयी पाठींब्याची विनंती

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, पावळ्यात यमुना नदिच्या पाण्याचा साठा करण्याविषयी पाठींब्यासाठी केंद्र सरकारचा पाठींबा मिळावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. दिल्लीची एका वर्षाची तहान भागविण्यासाठी एका पावसाळ्याचे पाणी भरपूर आहे. तसेच या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीतील पालिका शाळांमधील ‘मोहल्ला क्लिनीक’ला भेट देण्याविषयी आमंत्रण देण्यात आल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.