घरदेश-विदेशहाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न; ४ जणांना अटक

हाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न; ४ जणांना अटक

Subscribe

हाथरस घटनेचे पडसाद देशभर उमटल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मथुराजवळील एका टोल नाक्यावर अटक करण्यात आली असून हे चौघेही दिल्लीहून हाथरसच्या दिशेने जात होते. यातील एक विद्यार्थी जामियाचा असल्याचे समजते. तसेच उत्तर प्रदेशातील दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.

बहराइच जिल्ह्यातील जरवाल रोड येथे राहणाऱ्या मसूद अहमद याला पोलिसांनी अटक केली आहे. मसूद अहमद हा दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये एलएलबीचा विद्यार्थी आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो कॅम्पस फ्रेंड्स ऑफ इंडियाशी संबंधित आहे. जी पॉप्युलर फ्रेंड ऑफ इंडियाची विद्यार्थी संघटना आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

हाथरस सामूहिक बलात्का प्रकरणी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. जातीय हिंसाचार पसरवण्याच्या उद्देशाने सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले होते.

हेही वाचा –

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -