बलिया हत्याकांड : लखनौमधून फरार मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला अटक

बलिया गोळीबार हत्याकांडातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंह याला अखेर लखनौमधून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं (STF) लखनऊच्या जनेश्वर मिश्र पार्कमधून धीरेंद्रला आज, रविवारी सकाळी अटक केली आहे. घटनेनंतर धीरेंद्र घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते. बलियातील दुर्जनपूर गावात दोन गटांत सरकारी दुकान वाटपावरून झालेल्या वाद आणि भांडणानंतर करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची घटना समोर आली होती. बलिया गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे.

आरोपी धीरेंद्र सिंहने यापूर्वी एक व्हिडिओ जारी करत स्वत: निष्पाप असल्याचे सांगितले होतं. तसेच आरोपी भाजप नेता धीरेंद्रने पोलीस अधिकाऱ्यांसमोर (सीओ आणि एसडीएमच्या उपस्थितीत) जयप्रकाश पाल नावाच्या ४६ वर्षीय व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली होती. धीरेंद्र सिंह याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे १० गट काम करत होते. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) आणि गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे याआधीच पोलिसांनी जाहीर केले होते.

हेही वाचा –

चीनचा धक्कादायक दावा; थंड पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले कोरोनाचे जीवंत विषाणू!