घरदेश-विदेशरामलीला मैदानावर काँग्रेसची ‘भारत बचाव रॅली'

रामलीला मैदानावर काँग्रेसची ‘भारत बचाव रॅली’

Subscribe

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात कायद्यात रुपांतर झाल्यानंतर काँग्रेसने याविरोधात आज रामलीला मैदानावर ‘भारत बचाव रॅली’ काढली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात कायद्यात रुपांतर झाल्यानंतर काँग्रेसने याविरोधात आज रामलीला मैदानावर ‘भारत बचाव रॅली’ काढली आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मोठी रॅली आहे. या रॅलीपूर्वी ज्याप्रकारे भाजपाने संसदेत राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज या रॅलीद्वारे काँग्रेस नेत्यांबरोबरच राहुल गांधी यांचाही आक्रमक पवित्रा पहायला मिळू शकतो.

- Advertisement -

मोदी सरकारला घेरले

रामलीला मैदानावर काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकत्व कायद्यावरुन ईशान्य भारतात उसळलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्याबरोबरच पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हा कायदा लागू न करण्याचा निर्णय तिथल्या राज्य सरकारांनी घेतला आहे.

भारतीय दुतावासांसमोर होणार आंदोलन

जगभरातील बेरोजगारी, बिकट अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने शनिवारी ‘भारत बचाव रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतीय दुतावास आणि उच्चायोगाबाहेर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत पोहोचली आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, जर्मनी, सौदी अरेबिया, ओमान येथील भारतीय दुतावासांच्या बाहेर होणाऱ्या या आंदोलनांचे निरिक्षण आयओसीचे अध्यक्ष सॅम पित्रोडा करणार असल्याचे आयओसीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – घरातील ज्येष्ठांची देखभाल न घेतल्यास होणार ‘ही’ शिक्षा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -