घरदेश-विदेशविकास हवाय हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलं; फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार

विकास हवाय हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलं; फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार

Subscribe

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील NDA ची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. विधानसभेच्या सर्व २४३ जागांचे निकाल हाती आले असून एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत. या १२५ जागांपैकी ७४ जागांवर विजय मिळवत भाजप बिहारमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमार यांच्या जदयूने ४३ जागांवर तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती. विजयानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. हा विजय म्हणजे मोदींवरील विश्वास कायम असल्याचे संकेत आहेत असे फडणवीस म्हणाले.

बिहारमधील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्ट करत बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. “बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिले आहे. आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेने पूर्ण विश्वास टाकला आहे. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो. बिहारमध्ये भाजपने ११० जागांवर निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजयाची टक्केवारी ६७ टक्के इतकी असून २०१५ मध्ये हीच टक्केवारी ३४ इतकी होती. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण योजना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जाते. मी बिहारमधील भाजपच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. संपूर्ण बिहारने कोरोना कालावधीमध्येही उत्साहाने निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला. या यशस्वी निवडणुकीसाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो,” अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

धन्यवाद बिहार!
बिहार कि जनता ने यह साफ कर दिया है की वे विकास चाहते है,ना की जंगलराज!
हमारे जनप्रिय प्रधानमंत्री मा…

Posted by Devendra Fadnavis on Tuesday, 10 November 2020

देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पोटनिवडणुकीवर भाष्य केले आहे. फडणवीस यांनी सर्व भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. “देशातील ११ राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला मिळालेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणाबरोबरच अन्य राज्यातील आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो. या सर्व निवडणुकींमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे मार्गदर्शन केले, जे कष्ट घेतले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -