घरदेश-विदेशशत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान मोदींनाच म्हणणार ‘खामोssश’!

शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान मोदींनाच म्हणणार ‘खामोssश’!

Subscribe

भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा बंडखोरी करून समाजवादी पक्षातून लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून लढणार निवडणूक.

बॉलिवुडमधले एकेकाळचे सुपरस्टार आणि विद्यमान भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा त्यांचा ‘खामोश’ डायलॉगसाठी चाहत्यांमध्ये फेमस होते. पण राजकारणात आल्यापासून शत्रुघ्न सिन्हा स्वपक्षावरच म्हणजेच भाजपवरच टीका करण्यासाठी चर्चेत राहिले आहेत. आता मात्र शत्रुघ्न सिन्हा एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. कारण आता शत्रुघ्न सिन्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ‘खामोश’ म्हणणार आहेत! अर्थात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी शत्रुघ्न सिन्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातच लढण्याची शक्यता आहे. मोदींच्या वाराणसी मतदार संघातून शत्रुघ्न सिन्हा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. समाजवादी पक्षाकडून त्यांना उमेदवारी देऊ केली असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

वाराणसीतून लढणार निवडणूक?

२०१४च्या लोकसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गुजरातमधील वडोदरा मतदार संघातून जिंकले होते. त्याच मतदारसंघातून यंदाही ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या विरुद्ध यंदा समाजवादी पक्षाने थेट शत्रुघ्न सिन्हा यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. तशी ऑफरही शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे पोहोचल्याचंही समजतंय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये मोदी विरूद्ध शत्रुघ्न सिन्हा असा सामना पाहायला मिळू शकतो.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – म.प्र., राजस्थानबरोबरच महाराष्ट्रातही भाजपला धक्का


सिन्हांची नाराजी भाजपला भोवणार?

गेल्या काही वर्षांपासून शत्रुघ्न सिन्हा भाजपमध्ये राहून नाराज आहेत. पक्षातील त्यांचे गुरू लालकृष्ण आडवाणी यांना भाजपने मुख्य प्रवाहातील राजकारणापासून दूर केल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ शत्रुघ्न सिन्हा यांनाही पक्षात कोणतेही स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा सुरुवातीपासूनच नाराज होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप नेत्यांना धडा शिकवण्याचा त्यांनी निर्धार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -