घरट्रेंडिंगऐकावं ते नवलंच! मुलाच्या लांब नाकामुळे मुलीने लग्न मोडलं!

ऐकावं ते नवलंच! मुलाच्या लांब नाकामुळे मुलीने लग्न मोडलं!

Subscribe

नवऱ्या मुलाच्या नाकावर आक्षेप असल्यामुळे मुलीने ठरलेलं लग्न मोडलं आणि त्यामुळे संतापलेल्या नवऱ्या मुलाने मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे.

आजकाल कुणाचं कशामुळे लग्न ठरेल आणि कशामुळे मोडेल, याचा काहीही नेम नाही. बंगळुरूमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तरी हेच चित्र दिसत आहे. बंगळुरूत एका मुलीने नवऱ्या मुलासोबतचा विवाह ऐनवेळी नकार देत रद्द केला. पण त्याला तिने दिलेलं कारण अजब आहे. मुलाचा बाहेरख्यालीपणा, त्याची नोकरी, पहिलं लग्न किंवा असं कोणतंही कारण या मुलीने दिलेलं नाही. नवऱ्या मुलाचं लांब नाक आवडत नसल्यामुळे लग्नाला नकार देत असल्याचं या मुलीने कळवलं आणि सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला. अनेकदा मनधरणी करून देखील नवरी मुलगी लग्नास तयार होईना. शेवटी कंटाळून नवऱ्या मुलाने तिच्याविरुद्ध थेट पोलिसात फसवणुकीचा गुन्हाच दाखल केला!

नक्की झालं काय?

बंगळुरूमध्ये राहणारा रमेश हा एक ३५ वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तर रश्मी अमेरिकेमध्ये नोकरी करते. या दोघांची भेट ऑनलाईन साईटवर झाली. ऑगस्ट महिन्यात या दोघांचं लग्न ठरलं. ९ सप्टेंबरला त्यांचा साखरपुडाही झाला. दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने ३० जानेवारी रोजी लग्नाची तारीखही ठरली. पण ऐनवेळी रश्मीने रमेशसोबत लग्नाला नकार दिला. याचं कारण विचारलं असता रमेशचं नाक लांब आहे म्हणून लग्न करायचं नाही, असं कारण रश्मीने दिलं. वर हे लांब नाक विकृत असल्याचं म्हणत रमेशची चेष्टा देखील केली.

- Advertisement -

हेही वाचा – अजब! दोन समलैंगिक मातांच्या पोटी वाढला एकच गर्भ!

फसवणुकीचा गुन्हा

या प्रकारामुळे रमेश चांगलाच भडकला. कारण लग्नाची तारीख ठरल्यानंतर रश्मी लागलीच अमेरिकेला निघून गेली. पण इकडे रमेशच्या कुटुंबियांनी लग्नाची जोरदार तयारी सुरू केली होती. लाखो रुपये देखील खर्चून झाले होते. मात्र, अचानक रश्मीच्या वडिलांनी फोन करून लग्न मोडत असल्याचं सांगितल्यामुळे रमेशच्या कुटुंबियांना फसवणूक झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४१७ आणि ४२० अन्वये रश्मी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -