घरदेश-विदेशकरोडो खर्च करून बांधले ऑपरेशन थिएटर अन् हॉस्पिटलला दरवाजाच करायला विसरले!

करोडो खर्च करून बांधले ऑपरेशन थिएटर अन् हॉस्पिटलला दरवाजाच करायला विसरले!

Subscribe

वाचा काय आहे नेमका प्रकार

करोडो खर्च करून २५ खाटांचा वॉर्ड तयार केले यासह ऑपरेशन थिएटर बांधले. परंतू हे बांधकाम झाल्यावर एक हास्यास्पद प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडला तो राजस्थानच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये घडला आहे. बांसवाडा जिल्ह्यातील सर्वात मोठे महात्मा गांधी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला पाहून अनेकांना एकच प्रश्न पडला आहे. २५ खाटांचे सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर बांधले पण आत जायचे कसे? या भल्या मोठ्या हॉस्पिटलला दरवाजाच करायला विसरले! होय अगदी बांधकाम करणाऱ्यांच्या मूर्खपणाचा एक नमुनाच इथे दिसत आहे.

असा घडला प्रकार

ऑपरेशन थिएटर बांधणारा जो कंत्राटदार होता तो या वॉर्डला दरवाजाच ठेवायचा विसरला आहे. धक्कादायक म्हणजे मागील बाजुने अडीज फुटांचा आपत्कालीन दरवाजा आहे. तेथूनच रुग्णांना यावे लागणार आहे. या दरवाजातून स्ट्रेचर किंवा अन्य मशीन नेता येणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी राज्य सरकारने बांसवाडाच्या महात्मा गांधी रुग्णालयाच्या बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या वरील मजल्यावर २५ बेडच्या सर्जिकल वॉर्ड बांधण्यासाठी परवानगी मिळाली. यासोबत ऑपरेशन थिएटरदेखील बांधण्यात येणार असून यासाठी एक कोटीचे बजेट ठेवण्यात आले होते. याची जबाबदारी राष्ट्रीय आरोग्य मिशनला सोपविण्यात आली होती. या वॉर्डचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे, परंतू एक मोठी चूक समोर आली आहे.

- Advertisement -

डिझाईनशिवाय तयार केलेल्या या वॉर्डला येण्याजाण्यासाठी दरवाजाच बांधण्यात आलेला नाही. फक्त आपत्कालीन परिस्थीतीसाठी अडीज फुटांचा दरवाजा ठेवण्यात आला आहे. आता ओटीमधील मशीने आणि तत्सम सामुग्री कशी आत नेणार हाच प्रश्न पडला आहे. धक्कादायक म्हणजे कंत्राटदाराला शेवटपर्यंत लक्षात आले नाही. कारण त्याने क्रेनच्या साह्याने बांधकाम साहित्य वर पोहोचवले होते. डॉक्टरांनीही याकडे लक्ष दिले नाही.


अर्णब यांना दिलासा नाहीच, ९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -