घरक्राइमHathras Rape Case: सीबीआयकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तपासासाठी समिती गठीत

Hathras Rape Case: सीबीआयकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तपासासाठी समिती गठीत

Subscribe

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने गुन्हा दाख केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे. सीबीआयने तपासासाठी एक टीम तयार केली आहे. हाथरसमधील या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवला. मात्र, या घटनेचा तपास सीबीआयकडून नको तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांमार्फत झाला पाहिजे, अशी मागणी पीडितेच्या आईने केली होती.

दरम्यान, सीबीआयने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत हाथरस प्रकरणातील एका आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचं सांगितलं. यापूर्वी पीडितेच्या भावाने हाथरसच्या चांदपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. १४ सप्टेंबर २०२० रोजी आरोपींनी तिच्या बहिणीचा बाजरीच्या शेतात गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तथापि, या घटनेचा तपास आता सीबीआय करत आहे. घटनेला सुमारे २७ दिवस झाले आहेत. आधी हाथरस पोलीस, त्यानंतर एसआयटी आणि आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

- Advertisement -

सीबीआयच्या आधी एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत होती. जेव्हा एसआयटीने १४ सप्टेंबरला नेमकं काय घडलं याचं सत्य जाणून घेण्यासाठी तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या निशाण्यावर गावातील ४० लोक होते. गावातील या ४० लोकांची चौकशी केली गेली आहे. हे ४० लोक १४ सप्टेंबर रोजी आसपासच्या शेतात काम करीत होते. यात आरोपी आणि पीडितेच्या घराचा समावेश आहे.

१२ ऑक्टोबरला होणार सुणावणी

दरम्यान, हाथरस पीडितेचे कुटुंब लखनऊला जात आहे. यूपी पोलीस पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कडक बंदोबस्तात लखनौला घेऊन जाणार आहेत. उद्या १२ ऑक्टोबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर हाथरस खटल्याची सुनावणी होणार आहे. यासाठी कुटुंबातील पाच सदस्य आणि काही नातेवाईक लखनऊला रवाना होतील. यूपी पोलिस त्यांना त्यांच्या सुरक्षेखाली लखनौला नेतील. डीआयजी लखनऊ शलभ माथूर यांनीही पीडितेच्या गावाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Hathras Rape Case: हाथरस प्रकरणाची चौकशी अखेर CBI कडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -