घरताज्या घडामोडीHathras Rape Case: हाथरस प्रकरणाची चौकशी अखेर CBI कडे

Hathras Rape Case: हाथरस प्रकरणाची चौकशी अखेर CBI कडे

Subscribe

हाथरसच्या प्रकरणानंतर देशभरातून संतापाची लाट उसळल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. हाथरस बलात्कार प्रकरणाचा तपास आता CBI कडे देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षांकडून सीबीआय चौकशीची मागणी होत होती. मात्र, पीडितेच्या कुटूंबाने सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती. आज दुपारीच उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी आणि पोलीस महासंचालक हितेशचंद्र अवस्थी यांनी हाथरस पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत दोषींवर कडक कारवाई करु, असे आश्वासन दिले होते.

- Advertisement -

पीडितेच्या आईने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून नको तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांमार्फत झाला पाहिजे. त्यांच्या अध्यक्षतेखाली तपास झाला पाहिजे, अशी मागणी केली होती. पीडितेच्या भावाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा होती, परंतु सीबीआय चौकशीही ठीक आहे.

हे वाचा – Hathras Rape Case: ‘अशी शिक्षा देऊ की उदाहरण प्रस्थापित होईल’ – योगी आदित्यनाथ

- Advertisement -

कालच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, “उत्तर प्रदेशमध्ये माता-भगिनींचा सन्मान-स्वाभिमानाला हानी पोहोचवणाऱ्यांचा समूळ नाश निश्चित आहे. यांना अशी शिक्षा मिळेल की भविष्यात उदाहरण प्रस्थापित होईल. आपले उत्तर प्रदेश सरकार माता-भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी कटिबद्ध आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -