चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु

२० ऑगस्ट रोजी चांद्रयान-२ हे चंद्राच्या कक्षेत पोहचणार

Mumbai
चांद्रयान

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेल्या चांद्रयान-२ ने प्रवासाचा पहिला टप्पा नुकताच पार केला आहे. मंगळवारी रात्री २ वाजून २१ मिनिटांनी चांद्रयान पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. इस्रोने ट्रान्स लूनर इंजेक्शनला यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. स्पेसक्राफ्टचे लिक्विड इंजिन १,२०३ सेकंदासाठी फायर करण्यात आले. यानंतर २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. यानंतर तब्बल २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिलेल्या चांद्रयानाने चंद्राच्या हद्दीत प्रवेश केला.

२० ऑगस्ट रोजी चांद्रयान-२ हे चंद्राच्या कक्षेत पोहचणार

‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी चांद्रयान-२ प्रवासाबद्दल माहिती देताना असे सांगितले की, पुढील सहा दिवस चांद्रयान आपला चंद्राच्या दिशेने प्रवेश सुरू ठेवणार असून चंद्र हा पृथ्वीपासून ३.८४ लाख किलोमीटर अंतरावर आहे. ४.१ लाख किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. यानंतर २० ऑगस्ट रोजी चांद्रयान-२ हे चंद्राच्या कक्षेत पोहचणार आहे.