घरदेश-विदेशसर्व मशिदींवर राष्ट्रध्वज फडकवा, चीनचा मुस्लिमांना आदेश

सर्व मशिदींवर राष्ट्रध्वज फडकवा, चीनचा मुस्लिमांना आदेश

Subscribe

चीन सरकारने मुस्लिमांवरील बंधने अधिक कडक केली असून, देशातील सर्व मशिदींमध्ये राष्ट्रध्वज फडकविण्याचे आदेश जारी केले आहेत. मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात यावे, असे मुस्लिमांच्या सर्वोच्च नियामक संस्थेने म्हटले आहे.

चायनीज इस्लामिक असोसिएशन या संस्थेने शनिवारी एक निवेदन प्रसिद्ध करून हे आदेश दिले आहे. संघटनेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या या पत्रकात म्हटले आहे, की सर्व मशिदीच्या अंगणात प्रमुख स्थानी राष्ट्रध्वज प्रमुख स्थानी फडकविण्यात यावा. यामुळे राष्ट्रीय आणि नागरी आदर्शांची जाणीव अधिक मजबूत होईल आणि सर्व वंशांच्या मुसलमानांमध्ये देशभक्ती निर्माण करेल, असे त्यात म्हटले आहे. चायनीज इस्लामिक असोसिएशन ही सरकारशी संलग्न असलेली संस्था असून तिच्याकडे इमामांना मान्यता देण्याचा एकमेव अधिकार आहे.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर मशिदीच्या कर्मचाऱ्यांनी चिनी राज्यघटना आणि इतर संबंधित कायदे विशेषत: नवीन धार्मिक नियमांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी अभिजात चिनी साहित्याचे परिशीलन करून पारंपरिक चिनी संस्कृतीच्या अभ्यासक्रमांची निर्मिती करणे आवश्यक आहे. तसेच परकीय मुस्लीम महनीय व्यक्तीऐवजी चिनी मूळ असलेल्या महनीय व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -