पूर्व लडाखच्या LAC सीमेजवळ चीनचे शस्त्रधारी सैनिक तैनात

चीन वारंवार भारतीय सीमेवर कुरहोडी करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच पूर्व लडाख भागात LAC च्या जवळ चीनचे शस्त्रधारी सैनिक तैनात असल्याचे आढळून आले असून याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. LAC म्हणजेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैन्य तैनात करण्यात आले आहेत. चिनी सैन्याच्या हातात स्टिक मॅचेट्स नावाचे शस्त्र असून पूर्व लडाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी सुमारे ४० ते ५० सशस्त्र चिनी सैनिक तैनात करण्यात आले असून त्यांच्या हाती धारदार शस्त्र असल्याचे सांगितले जात आहे.

पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला. चिनी सैन्यांनी हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. भारतीय लष्कराकडून सोमवारी संध्याकाळी लडाखमध्ये झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. पिपल्स लिबरेशन आर्मी सतत कराराचे उल्लंघन करत असून आक्रमकता दाखवत असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले होते.

हेही वाचा –

दररोज दुधासाठी आंदोलन करावे लागतेय, राजु शेट्टी नेमके कोणासोबत ?