घरदेश-विदेश'त्या' विधानामुळे साध्वींची निवडणूक आयोगाकडे तक्रार

‘त्या’ विधानामुळे साध्वींची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Subscribe

भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानमुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत.

भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानमुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत. साध्वी प्रज्ञासिंह विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आयपीएस असोसिएशननेही साध्वीच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याची तक्रार आमच्याकडे आली असून त्याविषयी अधिक तपास सुरू आहे, असं मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे.

सर्व शहिदांच्या बलिदानाचा आदर केला पाहिजे

आयपीएस असोसिएशने ट्विट करत सांगितले आहे की, अशोक चक्र पुरस्कार विजेते हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना सर्वोच्च बलिदान दिले. भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही निषेध करतो. सर्व शहिदांच्या बलिदानाचा आदर केला पाहिजे, असं सांगत साध्वी यांच्या विधानावर भाष्य केलं आहे.

- Advertisement -

या विधानावर तीव्र प्रतिक्रिया 

निवडणुकीच्या काळात लष्कर आणि शहीद जवानांबद्दल कोणतीही टिप्पणी करु नये, असे निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. मुंबई दशतवादी हल्ल्यात लोकांना वाचवताना ते शहीद झाले, अशी भोपाळ काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी दिली आहे. तर शहीद हेमंत करकरे यांना मारल्यामुळे प्रज्ञा सिंह साध्वीचं सुतक संपलं…?’, याचा अर्थ करकरे यांना मारणारे मास्टर माईंड आणि साध्वीचे बोलवते धनी आरएसएस रुपी कोण आहेत. हे भारतासमोर आज आलेला आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहींची ‘जीभ’ छाटली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -