घरदेश-विदेश'१५ ते २० दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील'

‘१५ ते २० दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील’

Subscribe

येत्या १५ ते २० दिवसांत मध्य प्रदेशमधील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक होतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस मंत्री पी. सी. शर्मा यांनी केले आहे.

मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी. सी. शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यांची परिस्थिती पाहून पी. सी. शर्मा यांनी रस्त्यांची तुलना भाजपचे राष्ट्रीय महासचिल कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासोबत केली. त्याचबरोबर हे सर्व रस्ते १५ ते २० दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक होतील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राज्याच्या मंत्रीपदी असणाऱ्या व्यक्तीने एका महिलेप्रती असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अयोध्या राम मंदिर प्रकरण आज निकाली निघणार?

काय आहे नेमके प्रकरण?

मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पी. सी. शर्मा यांनी मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पीडब्लूडी मंत्री सज्जन सिंह वर्मा देखील उपस्थित होते. या पाहणी दरम्यान रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे निदर्शनास आले. या रस्त्यांबाबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २०१७ साली मोठा दावा केला होता. मध्य प्रदेशमधील रस्ते हे वॉशिंग्टन येथील रस्त्यांपेक्षा छान असल्याचे त्यांनी म्हटले होते. याच वक्तव्यावरुन पी. सी. शर्मा यांनी शिवराज यांना टोला लगावला. मंगळवारी रस्त्यांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ‘भोपाळमध्ये वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कसारखे रस्ते तयार केले होते त्याचे काय झाले? पावसामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे कैलास विजयवर्गीय यांच्या गालासारखे झाले आहेत. आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आदेशानंतर १५ दिवसांत लगेच सगळे रस्ते बनतील. १५ ते २० दिवसांत हे रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक होतील’, असे पी. सी. शर्मा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -