‘हा घ्या पुरावा; मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले’

New Delhi
Rahul Gandhi Rafeal Scam Proof
राफेल घोटाळ्यात राहुल गांधींनी सादर केला पुरावा

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच संसदेमध्ये त्यांच्या या कार्यकाळाचं संसदेतलं शेवटचं भाषण आक्रमकपणे करत देशाला लुटणाऱ्यांना मी घाबरवणारच’ असं ठासून सांगितलं आहे. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला आहे. ‘मोदींनी ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानींना दिले’, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नवी दिल्लीमध्ये शुक्रवारी सकाळी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये हा धक्कादायक आरोप केला आहे.

Rafael Scam
राफेल घोटाळा
काय म्हणाले राहुल गांधी?

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल घोटाळ्यामधून एअरफोर्सचे ३० हजार कोटी चोरून अनिल अंबानी यांना दिले. निर्मला सीतारमण यांनी देखील देशाला खोटं सांगितलं. वायुसेनेची कागदपत्र माझ्याकडे आहेत. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी त्यात म्हटलं आहे की देशाचे पंतप्रधान फ्रान्ससोबत समांतर वाटाघाटी करत आहेत. वायुसेनेत कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच हा खुलासा केला आहे. देशाचे संरक्षण सचिवांनी सुद्धा राफेल विमान खरेदीच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थी करणं चुकीचं असल्याचं या कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आमच्या वाटाघाटींवर परिणाम होत आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

इथे पाहा राहुल गांधींची संपूर्ण पत्रकार परिषद!