घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टपंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या विजयाच्या प्रतिक्षेत

पंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या विजयाच्या प्रतिक्षेत

Subscribe

पंजाबमध्ये १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष २०१९ सालच्या निवडणुकीत जास्तीतजास्त जागा मिळवून गेल्या विधान सभेेचे यश अधिक सशक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने आपला मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल यांच्यासोबत निवडणुकपूर्व युती केली आहे. दोन्ही पक्षांनी २०१४ सालच्या फॉर्म्युलानुसार जागा वाटप करायचे ठरवले आहे. त्यानुसार शिरोमणी अकाली दलाने १० तर भाजपने ३ जागी आपले उमेदवार उभे केले आहेत. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षही पंजाबमध्ये सज्ज झाला आहे.

दिल्लीनंतर पंजाबमध्ये जास्त जागा मिळतील अशी त्यांना आशा आहे. त्यांनी शिरोमणी अकाली दल (तकसाली) या शिरोमणी अकाली दलातून फुटलेल्या गटाशी युती केली आहे. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केले होते. मात्र शेतकर्‍यांची फसवणूक, तरुणांमध्ये वाढलेली व्यसनाधिनता, बेरोजगारी, राज्यातील दलित आणि गरिब जनतेमधील असंतोष यामुळे काँग्रेसवर विरोधकांकडून जोरदार प्रहार होत आहे.

- Advertisement -

पंजाबमधील मतदार
पंजाबमध्ये एकूण २ कोटी ०३ लाख ७४ हजार ३७५ मतदार आहेत. त्यापैकी १ कोटी ७५ लाख, ४ हजार १५७ मतदार हे पुरुष असून ९६ लाख, १९ हजार, ७११ महिला मतदार आहेत. तर ५०७ मतदार हे किन्नर आहेत.

२०१४ सालचे बलाबल
पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. राज्यात काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल हे दोन मुख्य पक्ष आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला -३, शिरोमणी अकाली दल -४, आम आदमी पक्ष -४, भाजप – २ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला मिळालेली मते ३३.०५ टक्के, शिरोमणी अकाली दलला २६.२६ टक्के, आपला २४.३६ टक्के तर भाजपला ८.७३ टक्के मते मिळाली होती.

- Advertisement -

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
१) पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे पाकिस्तानवरील एअर स्ट्राइक.
२) कर्तारपूर कॉरीडॉर
३) शेतकर्‍यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी
४) काँग्रेस सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे.

पंजाबमधील मतदार संघ
१- गुरुदासपूर, २- अमृतसर, ३ – खदूरसाहिब, ४ -जालंधर, ५ -होशियारपूर, ६ -आनंदपूर साहिब, ७ -लुधियाना, ८ – फतेहगढ साहिब, ९ -फरीदकोट, १० -फिरोजपूर, ११ -भटिंडा, १२ -संगूर, १३ -पटियाला.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -