घरदेश-विदेशफलाटावरील मोफत वाय-फाय वापरुन 'तो' ठरला 'कुली नंबर १'!

फलाटावरील मोफत वाय-फाय वापरुन ‘तो’ ठरला ‘कुली नंबर १’!

Subscribe

स्पर्धा परीक्षा म्हटलं की पुस्तकांचा ढिगारा, दिवसभर अभ्यास, बंद खोली, घर-दार सोडून अभ्यासात जुंपलेले विद्यार्थी आपल्या डोळ्यांसमोर येतात. या मार्गाने तपश्चर्या करुनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते, ही पूर्वापार चालत आलेली समजूत. अनेकांना या मार्गातून यश मिळते तर काहीजण खचून जातात. मात्र पूर्वापार चालत आलेली ही समजूत एका कुलीने मोडून काढत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. फक्त रेल्वे फलाटावर बसवलेल्या मोफत वाय-फायच्या साह्याने त्याने हे यश मिळवले असल्याने तो “कुली नंबर १” ठरला आहे. ‘श्रीनाथ के’ असे त्याचे नाव असून, मागील पाच वर्षांपासून केरळ येथील एर्नाकुलम स्थानकावर तो कुलीचे काम करत होता. सध्या तो जमीन आणि महसूल विभागाची क्षेत्रसहाय्यक पदासाठी तो उतीर्ण झाला आहे.

स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे व्याख्यान ठेवले जातात. या व्याख्यानाला लाखोंच्या संख्येने परीक्षार्थी उपस्थित राहतात. अधिकाऱ्यांच्या भाषणाने प्रेरीत होऊन हे परीक्षार्थी स्पर्धा परीक्षा हे एकमेव लक्ष ठेवतात. यासाठी घर सोडून किंवा नोकरी सोडून ते परीक्षेच्या तयारीला लागतात. मात्र अनेकदा अयशस्वी ठरल्यानंतर त्यांचे लक्ष्य काळानुसार बदलत जाते. मात्र कुलीचे काम करुनही जिद्द न सोडता श्रीनाथने स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. दिवसभर लोकांच्या बॅगा वाहून नेऊन रात्री मोफत वाय-फायचा वापर करुन त्याने स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवले. मागील वर्षाचे पेपर, गणित सोडवण्याच्या शॉर्टकट पद्धती आणि सामान्य ज्ञानाची माहिती त्याला इंटरनेटवरच उपलब्ध झाले. या माहितीच्या साह्याने श्रीनाथला स्पर्धा परीक्षेत यश मिळाले.

- Advertisement -

आपल्या यशाबद्दल श्रीनाथ म्हणाला, “उच्च शिक्षण झाल्यानंतर मी रेल्वे फलाटावर कुलीचे काम करुन आपल्या कुटुंबियांचे पोट भरत होतो. मात्र स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून होतो. दिवसा कामामुळे अभ्यासाला वेळ मिळत नव्हता त्यामुळे कामादरम्यान कानात हेडफोन घालून मी अभ्यास करायचो. नेटवर उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि पीडीएफ पुस्तके वाचून मी सराव करत होतो. गणिताचे अनेक प्रश्न मी काम करते वेळी मनातच सोडवत होतो. मी आतापर्यंत तीन स्पर्धा परीक्षा दिल्यात. सलग परीक्षा देत गेल्यामुळे माझा सराव चांगला झाला व मी या परीक्षेत उतीर्ण होऊ शकलो”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -