CoronaVirus वर नियंत्रण मिळवण्यात जगात ‘हा’ देश आघाडीवर

कोरोना विषाणूची सुरुवात चीनपासून झाली असली तरी कोरोना नियंत्रित करणाऱ्या देशांमध्ये चीन सर्वात आघाडीवर आहे. दरम्यान कोणती रणनीती चीनमध्ये आखली गेली असेल, ज्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला हा देश व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाला आहे. याचे एकमेव उत्तर म्हणजे असणाऱ्या लोकसंख्येची कोरोना तपासणी मोठ्या प्रमाणात करणे. चीनच्या किंगडाओ शहरात कोरोनाच्या रूग्णांची नोंद केली गेली. आता सरकारने निर्णय घेतला आहे की संपूर्ण शहरातील लोकांची कोरोना तपासणी अवघ्या ५ दिवसांत व्हावी. म्हणजेच ५ दिवसांत ९० लाख लोकांची तपासणी केली जाईल.

दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, किंगडाओ शहराच्या ५ जिल्ह्यातील संपूर्ण लोकसंख्येची कोरोना तपासणी ३ दिवसात पूर्ण होईल. नुकतीच १२ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली तेव्हा चीनने संपूर्ण शहरात कोरोना तपासणी करण्याचे ठरविले.जेव्हाकिंगडाओ च्या रुग्णालयात परदेशातील लोकांची तपासणी केली गेली तेव्हा यापैकी काही जण कोरोना बळी असल्याचे आढळले. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रुग्णालयाशी संबंधित १.४ लाख कर्मचारी, रुग्ण आणि इतरांची तपासणी यापूर्वीच करण्यात आली आहे.

चीनमध्ये मोठ्या संख्येने लोकांच्या अधिक प्रमाणात कोरोना तपासणीमुळे, चीनमधील लोकांचे जीवन सामान्य बनू लागले आहे. त्यामुळे लोकांचे जीवन सामान्य झाले आहे. लोक मोठ्या अनेक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आहे जेणेकरून जगात चीनची प्रतिमा चांगली बनू शकेल.

तर जूनच्या सुरुवातीस, संपूर्ण लोकसंख्येची कोरोना तपासणी चीनची राजधानी बीजिंगमध्ये केली गेली. तसेच संपूर्ण शहरातील लोकांची कोरोना तपासणी वुहानमध्ये १९ दिवसांत झाली. चीनमध्ये कोरोनाची एकूण रुग्णसंख्या अधिकृतपणे केवळ ८५ हजार ६०० च्या जवळ आहेत आणि देशात कोरोनामुळे साधारण ४ हजार ६३४ लोकांचा जीव गेला आहे.