तीनही सैन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजारांच्या पार; ३५ जणांचा मृत्यू

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.

प्रातिनिधीक फोटो

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. तर संपूर्ण देश कोरोना या जागतिक साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत भारताची सैन्य कुठेही डगमगताना दिसत नाहीये. मात्र भारतीय सैन्याला देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे आले आहे. भारतीय लष्कर सैन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १६ हजार ७५८ रूग्ण नोंदवली गेली आहेत. तर नौदलात १ हजार ३६५ आणि वायु दलात १ हजार ७६१ अशी बाधितांची संख्या आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.

यावेळी नाईक यांनी असेही सांगितले की, भारतीय सैन्यात कोविड -१९ संक्रमणामुळे ३२ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ही संख्या हवाई दलात ३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, दिलासादायक म्हणजे कोविड -१९ संसर्गामुळे मृत्यूची एकही घटना नौदलामध्ये नोंदली गेलेली नाही. कर्तव्यावर असताना आपला मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना टर्मिनल सुविधा पुरविल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी देशात कोरोनाचे ९० हजार १२३ नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधितांचा एकूण आकडा ५० लाखांच्या वर गेला आहे. देशात अवघ्या २२ दिवसांत रूग्णांची संख्या ४० लाखांवरून ५० लाखांवर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाचे एका दिवसात ८२ हजार ९६१ रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार,  गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले की, लेफ्ट विंगच्या अतिरेकी संबंधित हिंसाचारात मरण पावलेल्या लोकांची (नागरिक आणि सुरक्षा दलातील जवान) संख्या २०१९ मध्ये २०२ झाली तर २०१० मध्ये ही संख्या १००५ होती. ते म्हणाले की, २०२० मध्ये १५ ऑगस्टपर्यंत मृत्यूचे प्रमाण २०१९ या कालावधीच्या तुलनेत १३७ वरून १०२ पर्यंत कमी झाले आहे.


Babri Masjid Demolition Case: ३० सप्टेंबर रोजी लखनऊचे विशेष CBI कोर्ट देणार निकाल