घरदेश-विदेशदेशात फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची साथ येणार आटोक्यात; शास्त्रज्ञांचा दावा

देशात फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची साथ येणार आटोक्यात; शास्त्रज्ञांचा दावा

Subscribe

आता कोरोनाच्या साथीचा आलेख हळूहळू खाली येण्यास सुरुवात होईल परंतु फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील कोरोनाची साथ आटोक्यात येईल असेही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटले आहे.

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही लाखाच्या पुढे गेली. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. आता कोरोनाच्या साथीचा आलेख हळूहळू खाली येण्यास सुरुवात होईल परंतु फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील कोरोनाची साथ आटोक्यात येईल असेही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटले आहे.

इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले असून या समितीने असाही दावा केला आहे की भारतात कोरोना बाधितांची संख्या ही १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली असून मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केला नसता तर देशभरात कोरोनामुळे २५ लाख लोकांचा बळी गेला असता, असा ही दावा समितीने केला आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये कोरोनाची दुसरी लाट?

कोरोना हिवाळ्याच्या हंगामातच सर्वात विनाशकारी ठरणार आहे. हिवाळ्यात येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक असू शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. WHO सोबत काम केलेले संसर्गजन्य रोग तज्ज्ञ क्लाऊस स्टॉहर यांनी ‘द प्रिंट’ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की कोरोना विषाणूची साथीची वागणूक इतर श्वसन रोगांपेक्षा फारशी वेगळी नाही.

- Advertisement -

हिवाळ्यात काय येणार? कोरोनाची लस की दुसरी लाट? जाणून घ्या तज्ज्ञांची मते


हिवाळ्यात कोरोना विषाणू परत येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना करण्यासाठी जग चांगल्या तयारीत असणे आवश्यक आहे. कोरोनाची संभाव्य लाट सध्याच्या साथीच्या आजारापेक्षा अधिक तीव्र असू शकते. ब्रिटनच्या ‘वैद्यकीय विज्ञान अकादमी’ चेही असेच मत आहे. २०२१ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात २०२० च्या सुरूवातीला पहिल्या लहरीमध्ये जी परिस्थिती होती त्याप्रमाणेच परिस्थिती असेल, असे वैद्यकीय विज्ञान अकादमीच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -