Corona : कोरोनाचा उद्रेक! मृतांचा आकडा ८२ हजारांहून अधिक; तर रुग्णसंख्या ५० लाखांवर

Spike of 65,002 cases and 996 deaths reported in India, in the last 24 hours
देशात कोरोनाचा उद्रेक!

देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग आतापर्यंत देशातील ५० लाखांहून अधिक लोकांना झाला आहे. तर ८२ हझारांहून जास्त रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची एकूण वाढून ५० लाख ०८ हजार ८७८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ८१ हजार ९६४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, कोरोनामुळे आतापर्यंत ८२ हजार ०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे ९ लाख ९३ हजार ०७५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३९ हजार ३१ हजार ३५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल, मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनोचे सर्वाधिक २० हजार ४३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशात ८ हजार ८४६ , कर्नाटकात ७ हजार ५७६, उत्तर प्रदेशात ६ हजार ८४१, तामिळनाडूत ५ हजार ६९७ आणि दिल्लीत ४ हजार २६३ इतके नवे रुग्ण आढळून आले आहेत. जूनअखेरपर्यंत बंगळुरु भारतातील महारनगरांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गाचे शहर होते. आता बेंगळुरू हे त्यापुढे जाऊन देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले शहर बनले आहे.

महाराष्ट्रात काल, मंगळवारी दिवसभरात २० हजार ४८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दरम्यान, ५१५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,९७,४२३ वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे १९,४२३ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,७५,२७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,९१,७९७ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा –

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांनी मध्यस्थी करावी -संभाजीराजे छत्रपती