घरदेश-विदेशबेरोजगारांना 'डिफेन्स कॉरिडोर'कडून मिळणार रोजगार - राजनाथ सिंह

बेरोजगारांना ‘डिफेन्स कॉरिडोर’कडून मिळणार रोजगार – राजनाथ सिंह

Subscribe

'डिफेन्स कॉरिडोरवर'मुळे आता लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे.

डिफेन्स कॉरिडोरवरमुळे आता लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये डिफेन्स कॉरिडोरवर काम सुरु असून संरक्षण उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये हा रोजगार उपलब्ध होणार आहे. तब्बल अडीच लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी लखनऊमध्ये सुरु असलेल्या पूर्व विधानसभा मतदार संघातील जनसमागमयेथे बोलत असताना केली आहे. तसेच यासाठी सरकारने ९०० एकर जमीन घेतल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, लखनऊमध्ये होणऱ्या या प्रकल्पामुळे प्रगतीला मोठा वेग येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

फेब्रुवारीमध्ये होणार डिफेन्सचे प्रदर्शन

डिफेन्स कॉरिडोरचे फेब्रुवारीमध्ये प्रदर्शन होणार असून यामध्ये लखनऊ व्यतिरिक्त कानपूर, झांसी, चित्रकूट, अलिगड, आग्रा यांचा देखील समावेश असणार आहे. तसेच अनेक परदेशातील मोठ्या कंपन्यांनी संरक्षण कॉरिडोरमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यात संरक्षण क्षेत्रातील अमेरिकन कंपनी लॉकहीड मोर्टिनचा देखील समावेश आहे. लढाऊ विमान बनवणाऱ्या लॉकहीड मोर्टिन या कंपनीचा देखील यामध्ये समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये होणारे प्रदर्शन हे पाच दिवस आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनात अनेक उद्योगपतींचा समावेश असणार आहे.

- Advertisement -

२०२४ पर्यंत सगळ्यांच्या घरात पाणी येणार

लखनऊच्या विकासासाठी १ हजार १०० करोड रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. यातील २९८ करोड रुपये एसटीपीसाठी वापरण्यात येणार आहे. ज्याच्याद्वारे दूषित पाणी जाण्यासाठी मदत होणार असून २०२४ पर्यंत सगळ्यांच्या घराघरामध्ये शुद्ध पाणी येणार आहे.


हेही वाचा – मेक इन इंडियाच्या नाकावर टिच्चून बेरोजगारी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -