घरCORONA UPDATEकोरोना रुग्णांवर तासाभरात उपचार सुरू करा, दिल्ली सरकारनं ठणकावलं!

कोरोना रुग्णांवर तासाभरात उपचार सुरू करा, दिल्ली सरकारनं ठणकावलं!

Subscribe

एकीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत असताना दुसरीकडे दिल्ली सरकारने याबाबत कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने दिल्लीतल्या रुग्णालयांसाठी नवे मार्गदर्शक निर्देश जारी केले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे निर्देश हे रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्याला दिल्या जाणाऱ्या उपचारांसंदर्भातले आहेत. यामध्ये रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याच्यावर किंवा तिच्यावर तासाभरात उपचार सुरू केले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

दिल्लीमधल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २५ हजारांच्या वर गेला असून एकूण रुग्णसंख्या २५ हजार ००४ इतकी झाली आहे. त्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा १४४५६ असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ८९८ इतकी आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत तब्बल १ हजार ५१३ रुग्णांची वाढ झाली आहे. आजपर्यंत दिल्लीत वाढलेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. दिल्लीत कोरोनामुळे आजपर्यंत ६५० रुग्णांचा बळी गेला आहे.

- Advertisement -

काय आहेत नियम?

दिल्ली सरकारने दिलेल्या नव्या निर्देशांनुसार कोरोनाचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी तासाभराच्या आत रुग्णाची तपासणी करायला हवी. त्याशिवाय, रुग्णाला काही खाण्यासाठी दिलं गेलं पाहिजे. कोणताही पुढचा निर्णय न होता रुग्णाला ३ तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहायला लावता कामा नये. यासोबतच रुग्णाची तपासणी केल्यानंतर डॉक्टर पुढील बाबतीत निर्णय घेऊ शकतात:

१. रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेणे, त्याच्यासाठी योग्य तो बेड उपलब्ध करून देणे
२. जर रुग्णालयात आवश्यक ती सुविधा उपलब्ध नसेल किंवा पुरेशी नसेल तर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देणे. अश परिस्थितीत रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करेपर्यंत सर्व व्यवस्था संबंधित रुग्णालयाने करावी
३. रुग्णाला अॅडमिट करण्याची गरज नसेल, पण होम क्वारंटाईन करायचं असेल आणि त्यांच्या घरी तशी व्यवस्था नसेल, तर त्याची उपलब्ध कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था रुग्णालयाने लावावी
४. रुग्णाला कोविड उपचारांची गरज नसेल आणि होम क्वारंटाईन शक्य असेल, तर प्राथमिक समुपदेशन करून रुग्णाला डिस्चार्ज दिला जावा
५. जर रुग्णाचा रुग्णालयात आणल्यानंतर किंवा आणण्यापूर्वीच मृत्यू झाला तर मृतदेहाचं निर्जंतुकीकरण करून मृतदेह शवागारात पाठवला जावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -