घरदेश-विदेशनीरव मोदीला दणका; ३३० कोटीची संपत्ती जप्त

नीरव मोदीला दणका; ३३० कोटीची संपत्ती जप्त

Subscribe

लंडन, यूएईमधील फ्लॅट जप्त

पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला ईडीने दणका दिलेला आहे. नीरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे.अलिबागमधील फार्मा हाऊसवरदेखील ईडीने टाच आणली आहे. ईडीने यापूर्वी नीरव मोदीची २,३४८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

- Advertisement -

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांची जवळपास १३५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. गेल्या महिन्यात ‘ईडी’ने ही कारवाई केली होती. या संपत्तीमध्ये २३०० किलो पॉलिश हिरे, मोती आणि दागिन्यांचा समावेश आहे. नीरव आणि मेहुलनं कथितरित्या हे हिरे-दागिने हाँगकाँगला पाठवले होते. तिथून हे भारतात परत आणण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याची किंमत १ हजार ३५० कोटी रूपयांच्या जवळपास आहे. हे सर्व हाँगकाँगमधील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामात ठेवण्यात आले होते. मुंबईमध्ये आलेल्या १०८ कंसायमेंट्सपैकी ३२ हे नीरव मोदीद्वारे चालवण्यात येणाऱ्या कंपन्यांचे आहेत. तर उर्वरित हे मेहुल चोक्सीच्या कंपनीचे आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -