घरट्रेंडिंगदंड टाळण्यासाठी तिने चक्क अडीच किलो कपडे अंगावर चढवले

दंड टाळण्यासाठी तिने चक्क अडीच किलो कपडे अंगावर चढवले

Subscribe

या फोटोला सोशल मीडियावर ३३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून २० हजारांपेक्षा जास्त शेअर्स मिळाले

ज्यावेळी आपण आपल्या सुट्टी घालवण्यासाठी बाहेर फिरण्यास जातो, त्यावेळी excess lugagge fee टाळण्यासाठी कमीत कमी कपडे आपल्या लगेज बॅगेत भरणे हे एकप्रकारे टास्कच असते. मात्र एका तरूणाने आपल्या सामानाच्या बॅगेची excess lugagge fee भरणं टाळण्यासाठी एक युक्ती लढवली आहे.

या एअरलाइन्स महिला प्रवाश्याने तिच्या सामानाचे वजन कमी करण्यासाठी तसेच अतिरिक्त सामानाची फी भरणे टाळण्यासाठी चक्क २.५ किलो कपडे अंगावर चढवल्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहे. विमानात जास्तीत जास्त ७ किलोग्रॅम इतके वजन नेण्यास परवानगी असते. मात्र. फिलिपिन्समधील जेल रॉड्रिग्ज या तरूणीच्या (Gel Rodriguez) बॅगेचे वजन ९.५ किलोग्रॅम इतके असल्याने एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी तिला फेसबुकवर शेअर करण्यासाठी सांगितले.

- Advertisement -

याकरता तिने घेतला असा निर्णय

यावेळी या तरूणीने जास्तीचे सामान असल्याने तिला एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी अतिरिक्त सामानाची फी भरण्यासाठी सांगितले. मात्र तिला ही excess lugagge fee भरण्याची इच्छा नव्हती त्यामुळे जेल रॉड्रिग्जने तिच्या बॅगेतील जास्तीचे सामान कमी करण्याचा निर्णय घेतला. याकरिता तिने बॅगेतील वजन ६.५ किलोग्रॅम करण्यासाठी स्वतःच्या अंगावर २.५ किलोग्रॅम वजनाचे कपडे अंगावर चढवले.

तिने शेअर केलेल्या फेसबुकवरील फोटोमध्ये एकापेक्षा जास्त पँट, शर्ट आणि जॅकेट परिधान केल्याचे दिसतेय.

- Advertisement -

when the airline staff at the check in counter said: “EXCESS NA PO KAYO, 7kg lang po allowed na hand carry.”me: NO PROBLEM! ?*from 9kg to 6.5kg baggage ?#ExcessBaggageChallengeAccepted

Gel Rodriguez ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 1, 2019

 

हा फोटो शेअर करताना तिने #ExcessBaggageChallenge स्वीकारल्याचे सांगितले आहे. या फोटोला सोशल मीडियावर ३३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून २० हजारांपेक्षा जास्त शेअर्स मिळाले आहेत.  ‘मला excess lugagge fee भरायची नव्हती म्हणून मी स्वतःच्या अंगावर २.५ किलोग्रॅम वजनाचे कपडे अंगावर चढवले.’ , असे तीने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -