घरदेश-विदेशफेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा चोरला

फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा चोरला

Subscribe

फेसबुक युजर्सचे अकाउंट हॅक होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुन्हा एकदा ३ कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्याने युजर्स यांच्या डेडाविषयीच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उभ राहत असल्याचे दिसून येत आहे.

वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्याही वाढतं आहे. फेसबुक युजर्सचे अकाउंट हॅक झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. त्यामुळे फेसबुकवर माहिती टाकणे धोक्याचे झाले आहे. केंब्रिज अॅनालिटिकाचे प्रकरण ताजे असतानाच फेसबुकच्या २ कोटी ९० लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या मार्फत चोरण्यात आला डेटा

काही महिन्यांपूर्वी केंब्रिज अॅनालिटिका या संस्थेने फेसबुकवरील युजर्सचा डेटा चोरुन त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता. त्यादरम्यान फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांने जाहीर माफी देखील मागितली होती. त्यानंतर काही हॅकर्सने फेसबुकच्या View As सेंटिगचा गैरवापर करुन ३ कोटी युजर्सचा डेटा चोरला आहे. यामध्ये दीड कोटी यपजर्सची नाव, पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरीला गेली असून १ कोटी चाळीस लाख युजर्सची फेसबुक प्रोफाइलवरची बरीचशी माहिती चोरीला गेली असल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग साइट्सवरील युजर्स यांच्या डेडाविषयीच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उभ राहत आहे.

- Advertisement -

वाचा : ५ कोटी फेसबुक युजर्सची खाती हॅक

वाचा : ‘या’ कारणावरुन फेसबुक बनला चिंतेचा विषय

- Advertisement -

संबंधित पाहा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -